मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकने दोनच दिवसात दुसऱ्यांदा सरकारी रोखे खरेदी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने सरकारकडून ३० हजार कोटी रुपयांचे रोखे खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
कोरोनाने वित्तीय बाजारातील तणावाची स्थिती वाढत असल्याने आरबीआयने ३० हजार कोटींचे सरकारी रोखे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोख्यांची मुदत २०२० आणि २०२९ मध्ये संपणार आहेत.
हेही वाचा-येस बँकेच्या संस्थापकाला २ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने खुल्या बाजारामधून १५ हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. हे सरकारी रोखे २४ मार्च आणि ३० मार्चला खरेदी करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-गृहकर्जाचे १२ महिन्यांचे मासिक हप्ते स्थगित करा - एमसीएच-क्रेडाईची सरकारकडे मागणी
बाजारातील सर्व कामकाज सामान्यपणे चालावे, यासाठी आरबीआयकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच बाजारामध्ये चलनाची तरलता आणि उलाढाल ही पुरेशी व्हावी, असा आरबीआयचा प्रयत्न आहे. आरबीआय सरकारकडून एकूण ४५ हजार कोटी रुपयांचे रोखे खरेदी करणार आहे.