हैदराबाद - वित्त सचिव राजीव कुमार हे पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी आज वित्त मंत्रालयातील सेवाकाळाचा शेवटचा दिवस पूर्ण केला आहे. त्यांच्याजागी उत्तर प्रदेशच्या आयएएस बॅचचे देवाशीष पांडा हे रुजू होणार आहेत.
राजीव कुमार यांनी २८ फेब्रुवारीला ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, मी सरकारी कर्मचारी ( नागरी आणि सरकारी कर्मचारी म्हणून नेहमी सजग) म्हणून निवृत्त पेन्शनधारक होणार आहे. वित्त मंत्रालयाचे सचिव म्हणून शेवटचे ट्विट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.