जयपूर – राजस्थानमध्ये सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार असतानाच सक्त अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) सक्रिय झाली आहे. ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या कार्यालयांवर छापे मारले आहेत. खत घोटाळ्यातील मनी लाँड्रिगच्या प्रकरणात अग्रसेन यांचा सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.
ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीच्या 13 ठिकाणी देशाच्या विविध भागात छापे मारले आहेत. यामध्ये राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्लीचा समावेश आहे. खताच्या व्यवसायात उत्पादन शुल्काच्या प्रकरणात अग्रसेन यांच्यावर 7 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. अग्रसेन यांच्या जोधपूरमधील मालमत्तेवरही ईडीने छापे टाकले आहेत.