महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

प्लास्टिक बॉटल नष्ट करून मोबाईल रिचार्ज करा; रेल्वे मंत्रालयाचा उपक्रम - क्रशिंग मशिन

रेल्वे मंडळाचे चेअरमन व्ही.के. यादव म्हणाले, रेल्वे स्टेशनमध्ये ४०० क्रशिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. जर प्रवाशाने त्या क्रशिंग मशिनचा वापर प्लास्टिक बॉटल नष्ट करण्यासाठी केला तर त्याचा मोबाईल रिचार्ज करून देण्यात येणार आहे.

संग्रहित - प्लास्टिक बॉटल

By

Published : Sep 10, 2019, 2:51 PM IST

नवी दिल्ली - रेल्वे स्टेशनमध्ये प्लास्टिक क्रशिंग मशिन बसविण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवाशांनी प्लास्टिक बॉटल टाकल्यानंतर त्यांचा मोबाईल रिचार्ज करून देण्यात येणार आहे. एकवेळ वापरात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी सरकार हा उपक्रम सुरू करणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरात २ ऑक्टोबरपासून एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिकवर निर्बंध आणणारी अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने काढली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात एकवेळ वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. तसेच प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलला प्राधान्याने पर्याय सूचवावा, असे म्हटले होते.

हेही वाचा-भारत-नेपाळ दरम्यानच्या पेट्रोलिअम पाईपलाईनचे उद्घाटन; देशाची ३.५ अब्ज रुपयांची गुंतवणूक

रेल्वे मंडळाचे चेअरमन व्ही.के. यादव म्हणाले, रेल्वे स्टेशनमध्ये ४०० क्रशिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. जर प्रवाशाने त्या क्रशिंग मशिनचा वापर प्लास्टिक बॉटल नष्ट करण्यासाठी केला तर त्याचा मोबाईल रिचार्ज करून देण्यात येणार आहे. त्याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मशिनमध्ये चुराडा झालेल्या बॉटलचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना २ ऑक्टोबरला शपथ देण्यात येणार आहे.

हेही वाचा-भारताला निर्यातीचे केंद्र करा; नीती आयोगाची चिनी उद्योजकांना विनंती

सध्या, देशात १२८ रेल्वे स्टेशनमध्ये १६० बॉटल क्रशिंग मशिन बसविण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details