महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती मागणी; भारतीय रेल्वेकडून ७८ विशेष गाड्या सुरू

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून १ एप्रिलपासून ७८ रेल्वे सुरू केल्याचे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या विशेष रेल्वे जुलैपर्यंत १ हजार ३५४ फेऱ्या पूर्ण करतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वे

By

Published : May 27, 2019, 8:14 PM IST

नवी दिल्ली - जगात चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क असलेल्या भारतीय रेल्वेने उन्हाळ्यात विशेष ७८ रेल्वे सुरू केल्या आहेत. उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेवून आणि फास्ट-सुपरफास्ट रेल्वेची तिकिटे प्रवाशांना मिळत नसल्याने हा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून १ एप्रिलपासून ७८ रेल्वे सुरू केल्याचे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या विशेष रेल्वे जुलैपर्यंत १ हजार ३५४ फेऱ्या पूर्ण करतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

यामुळे रेल्वेला होतो उशीर-
प्रचंड वाहतूक हे रेल्वेसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. जर रेल्वेला उशीर झाल्यास तर आणखी उशीर होतो. कारण रेल्वे वाहतुकीसाठी दुसऱ्या रेल्वेची वेळ निश्चित असते. काही वेळा रेल्वेचे डब्बे हे मेन एक्सप्रेससाठी वापरले जातात. तेव्हा रेल्वेला पाच ते सहा तास उशीर होतो. तर डब्ब्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी किमान चार तास लागतात, असे त्यांनी सांगितले.

तरीही विशेष रेल्वे वेळेवर धावाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या देशात सुमारे १२०० रेल्वे रोज १० ते १२ लाख प्रवाशांची रोज वाहतूक करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details