महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा मार्ग सुसाट..13.68 लाख कोटींची होणार गुंतवणूक - Chhatrapati Shivaji Maharaj Terminus contract

भारतीय रेल्वेने 34,642 किलोमीटरच्या रेल्वे रुळाचे जाळे दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये देशातील 96 टक्के वाहतूक व्यापू शकते.

संग्रहित - रेल्वे
संग्रहित - रेल्वे

By

Published : Jul 18, 2020, 1:04 PM IST

नवी दिल्ली – येत्या पाच वर्षात भारतीय रेल्वेकडून महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांसाठी 13.68 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतणुकीमुळे देशातील रेल्वे रुळाच्या नेटवर्कची क्षमता वाढून आधुनिकीकरण होण्यासाठी मदत आहे.

भारतीय रेल्वेने 34,642 किलोमीटरच्या रेल्वे रुळाचे जाळे दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये देशातील 96 टक्के वाहतूक व्यापू शकते. मालवाहू रेल्वेकरता डिसेंबर 2021 पर्यंत कॉरिडॉर करण्यासारख्या विविध प्रकल्पांचा रेल्वेच्या योजनेमध्ये समावेश आहे.

हाय डेन्सिटी नेटवर्क (एचडीएन) अद्ययावत करून मार्गावीर रेल्वेचा वेग मार्च 2030 पर्यंत प्रति तास 130 किमी करण्याचा रेल्वेच्या योजनेमध्ये समावेश आहे. याचबरोबर सर्व एचडीएनचे विद्युतीकरण आणि सर्व एचडीएन रेल्वे मार्ग मार्च 2025 पर्यंत प्रति ताशी 160 किमी वेगासाठी सक्षम करणे, अशा योजना असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी दिली. वाहतुकीची वर्दळ व रणनीतीच्या दृष्टीने मार्गाचे महत्त्व आदी बाबी लक्षात घेवून काही प्रकल्पांचे तातडीने काम हाती घेण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील रेल्वे स्थानक आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन आठवड्यात 6 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी यादव यांनी अपेक्षा व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details