नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने विविध मदत क्रमांकाऐवजी एकात्मिक १३९ क्रमांक ठेवला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या तक्रारी सोडविण्यासाठी या एकाच क्रमांकावर प्रवाशांना संपर्क करणे सहजशक्य होणार आहे.
रेल्वेच्या सर्व मदत क्रमांकासाठी (१८२ वगळून) १३९ हा यापुढे कार्यरत राहणार आहे. हा क्रमांक प्रवाशांना लक्षात ठेवणे सोपे आहे. तसेच प्रवासादरम्यान आवश्यकता वाटल्यास त्यांना संपर्क करणे शक्य होणार असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे. तर १८२ हा क्रमांक हा रेल्वे सुरक्षेसाठी वापरण्यात येणार आहे. मदत क्रमांक १३९ हा विविध १२ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यावर प्रवाशांना 'इंटरअॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्सीव्ह सिस्टिम'ची (आयव्हीआरएस) सुविधा देण्यात येणार आहे. या क्रमांकावर कोणत्याही मोबाईलवरून संपर्क करता येणार आहे.
हेही वाचा-टाटा सन्स: एनसीएलएटीने कंपनी निबंधक कार्यालयाकडून मागविला 'हा' खुलासा
मदत क्रमांकाचा असा करता येणार वापर-
- सुरक्षा आणि वैद्यकीय मदतीसाठी प्रवाशांनी १३९ वर कॉल करून मोबाईलचे १ बटन दाबल्यास फोन हा मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांशी जोडला जाणार आहे.
- २ बटन दाबल्यास इतर आवश्यक गोष्टीबाबत प्रवाशी प्रश्न विचारू शकतात.
- ३ बटन दाबून खाद्यपान सेवेच्या तक्रारी व ४ बटन दाबून सामान्य तक्रारी प्रवाशांना करता येणार आहेत.
- ५ बटन दाबून रेल्वेच्या दक्षता विभागाकडे माहिती कळवू शकतात. अपघात अशा घटनांबाबत ६ बटन दाबून माहिती किंवा चौकशी करू शकतात.
- तक्रारीच्या निवारणाची स्थिती जाणून घेण्यासाठी ९ बटण आणि स्टार (*) बटन दाबून मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांशी प्रवाशांना बोलता येणार आहे.
हेही वाचा-'या' कंपनीला सुमारे १५ हजार कोटी भरण्याची दूरसंचार विभागाने दिली नोटीस