नवी दिल्ली - केंद्र सरकारने २०० रेल्वे सुरू होणार असल्याची घोषणा केल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात रेल्वे तिकीट खिडकी सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. त्यासाठी आचारसंहिता तयार करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल म्हणाले, की रेल्वेचे तिकिट आरक्षण करण्याची सुविधा १.७ लाख सामाईक सेवा केंद्रावर उद्यापासून सुरू होणार आहे. काही आठवडे टाळेबंदीनंतर भारताला सामान्यस्थितीत येण्याची वेळ आली आहे. त्यामागे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचा उद्देश आहे. येत्या काही दिवसात आणखी रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकावरील दुकाने सुरू करण्याची परवानगीही दिली आहे. मात्र, तेथून केवळ अन्नपदार्थ घेवून जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.