नवी दिल्ली- रेल्वे बोर्डाने राजधानी, शताब्दी आणि दुरांतोमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या रेल्वेच्या तिकीट दरात वाढ होणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार वातानुकूलित डब्यामधील चहाची किंमत ६ रुपयाने वाढून ३५ रुपये करण्यात आली आहे. तर नाष्ट्याचे दर ७ रुपयांनी वाढवून १४० रुपये करण्यात आले आहेत. तर दुपारचे आणि रात्रीचे जेवण हे १५ रुपयांनी महाग होऊन २४५ रुपये असणार आहे.
हेही वाचा - मैलाचा दगड : एचडीएफसीने ओलांडला 7 लाख कोटींच्या भांडवली मूल्याचा टप्पा
वातानुकूलित डब्याचा द्वितीय वर्ग व तृतीय वर्ग आणि चेअर कारमधील चहाची किंमत ही ५ रुपयाने वाढवून २० रुपये करण्यात आली आहे. तर नाष्ट्याचा दर ७ रुपयांनी वाढवून १०५ रुपये करण्यात आला आहे. दुपारचे आणि रात्रीच्या जेवणाचा दर हा १० रुपयांनी वाढवून १८५ रुपये करण्यात आला आहे. काही प्रादेशिक स्नॅक्सचा मेन्यूमध्ये समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा - भारतीय कंपन्यांमध्ये व्होडाफोन आयडियाला तिमाहीत सर्वाधिक तोटा