सॅन फ्रान्सिस्को- चिप तयार करणारी कंपनी क्वालकॉम्न आणि अॅपलमध्ये काही वर्षापासून पेटंटवरून वाद सुरू आहे. बौद्धिक संपदा अधिकार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी (पेटंट) क्वालकॉम्नने अॅपलकडून ३.१ कोटी डॉलरची नुकसान भरपाई मागितली आहे.
क्वालकॉम्नला हवीय अॅपलकडून ३.१ कोटी डॉलरची नुकसान भरपाई - क्वालकॉम्न
अॅपलने परवानगी न घेता पेटंट घेतलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याची तक्रार क्वालकॉम्नने केली आहे. याप्रकरणी अमेरिकेच्या न्यायालयात खटला सुरू आहे. एका आयफोनवर १.४० डॉलर याप्रमाणे दावा करण्यात आल्याचे क्वालकॉम्नने म्हटले आहे.

काय आहे पेटंट -
क्वालकॉम्नचे एक पेटंट आहे, यामध्ये फोन सुरू होताच इंटरनेटशी लगेच जोडला जातो. दुसऱ्या पेटंटमध्ये डाटा लवकर डाऊनलोड करण्यासाठी ग्राफिक्स प्रक्रिया आणि बॅटरीच्या आयुष्य या दोन्हीत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अॅपलसाठी ही रक्कम फार नाही. मात्र, क्वालकॉम्न ही मोबाईलचे नवीन घटक बनविणारी कंपनी असून त्याच्या नावाला आणि प्रतिष्ठेला धक्का बसेल, असे एका अहवालात म्हटले आहे.