मुंबई- देशातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था असलेली टाटा ट्रस्टने कारागिरांसाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी विविध कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन टाटा ट्रस्टने केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे हातमाग उद्योगावर परिणामावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात टाळेबंदीने कारागिरांच्या संकटात भर पडली आहे. देशात टाळेबंदी असल्याने २५ मार्चपासून बंद झालेले आर्थिक चलनवलन हे ३ मेपर्यंत ठप्प राहणार आहे. टाटा ट्रस्टमधील क्राफ्ट विभागाच्या प्रमुख शारदा गौतम म्हणाल्या, आपले कारागिर हे कुशल आहेत. अशा कठीण काळात त्यांच्यापाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. अशा वाईट परिस्थितीचा आजवर कुणीही अनुभव घेतला नाही. कारागिरांना आपल्या समाजकार्याची गरज नाही. त्यांच्या कलेची व हस्तकलेला दखल घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.