महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'या' सरकारी बँकेची ३८.१९ कोटी रुपयांची फसवणूक - Non Performing asset

रांची एक्सप्रेसवेकडे ३८.१९ कोटी रुपयांचे बुडित कर्ज (एनपीए) आहे. हे कर्ज फसवणूक असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्याची आरबीआयला माहिती देण्यात आली आहे.

Representative
प्रतिकात्मक

By

Published : Jan 24, 2020, 7:59 PM IST

मुंबई- सरकारी बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. पंजाब आणि सिंध बँक या बँकेची ३८.१९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक रांची एक्सप्रेसवे कंपनीकडून झाल्याचा बँकेने दावा केला आहे.


गेल्या वर्षी भूषण पॉवर आणि स्टील कंपनीकडून २३८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पंजाब आणि सिंध बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेला कळविले होते.

हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे!

रांची एक्सप्रेसवेकडे ३८.१९ कोटी रुपयांचे बुडित कर्ज (एनपीए) आहे. हे कर्ज फसवणूक असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्याची आरबीआयला माहिती देण्यात आली आहे. नियमानुसार १५.२८ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही पंजाब आणि सिंध बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हेही वाचा-कर्मचाऱ्यांच्या संपाने कामकाजावर होणार परिणाम - एसबीआय

ABOUT THE AUTHOR

...view details