नवी दिल्ली -दक्षिण कोरियन गेमिंग कंपनी 'पब्जी'ने देशात पुन्हा पब्जी सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी मिळण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चिनी कंपनी टेन्सेंटला पब्जीचे भारतात वितरण करण्याचे अधिकार पब्जी कंपनीने काढून घेतले आहेत.
नुकत्याच घडलेल्या विविध घटनानंतर पब्जी कॉर्पोरेशनने टेन्सेंट इंडियाला भारतात दिलेली पब्जी मोबाईलचीफ्रँचाईजी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पब्जी कॉर्पोरेशनकडे पब्जीचे भारतामधील सर्वाधिकार राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. खासगी गोपनीयता आणि सुरक्षितता यासाठी भारत सरकारने केलेल्या उपाययोजना पब्जी कॉर्पोरेशन समजू शकते. कंपनी खासगी डाटा सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य देते, असा पब्जीने दावा केला आहे. तर टेन्सेंट कंपनीने प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्व नियम व कायद्यांचे पालन करून देशात पुन्हा गेमिंग सुरू करण्यासाठी सरकारबरोबर काम करणार असल्याचेही पब्जीने म्हटले आहे.
हेही वाचा-स्टेट बँक ऑफ इंडिया देणार १४ हजार नोकऱ्या; कर्मचाऱ्यांना देणार स्वेच्छानिवृत्ती