नवी दिल्ली - सरकारी बँका किरकोळ कर्ज व्यवसायात उतरत आहे. ग्राहकांना वाहन कर्ज आणि गृहकर्ज 'पीएसबीलोनईन५९मिनिट्स' हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.
गृहकर्ज आणि वाहन कर्ज हवयं ? सरकारी बँका देणार ५९ मिनिटात कर्ज - गृहकर्ज
सध्या 'पीएसबीलोनईन५९मिनिट्स' या पोर्टलमधून एमएमएमई क्षेत्रासाठी ५९ मिनिटे अथवा तासात कर्ज मंजूर करून देण्यात येते. या पोर्टलवरून इतर कर्ज सहज देण्यासाठी बँक ऑफ इंडियासह इतर बँका नियोजन करत आहेत.
सध्या 'पीएसबीलोनईन ५९ मिनिट्स' या पोर्टलमधून एमएमएमई क्षेत्रासाठी ५९ मिनिटे अथवा तासात कर्ज मंजूर करून देण्यात येते. या पोर्टलवरून इतर कर्ज सहज देण्यासाठी बँक ऑफ इंडियासह इतर बँका नियोजन करत आहेत. पोर्टलवरून वाहन कर्ज मंजूर करण्यासाठी बँक ऑफ इंडियाकडून काम केले जात असल्याचे बँकेचे महाव्यवस्थापक सलील कुमार स्वेन यांनी सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँकेने ५ कोटी रुपयापर्यंतची कर्ज देताना काही नियमात बदल केले आहेत. 'पीएसबीलोनईन५९मिनिट्स' पोर्टल सुरू झाल्यापासून अवघ्या चार महिन्यात ३५ हजार कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.