महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फेसबुकच्या गोपनीयतेच्या धोरणवर जागतिक संस्थांचे प्रश्नचिन्ह, लिब्रा आभासी चलन सुरू होण्यात अडथळा - केंब्रिज अनालिटिका स्कँडल

फेसबुकने केंब्रिज अॅनालिटिका स्कँडलमध्ये वापरकर्त्यांचा डाटा लीक केला होता. वैयक्तिक माहिती आणि वित्तीय माहिती यांच्या संमिश्रणाने वैयक्तिक गोपनीयतेची चिंता वाढणार असल्याचे

Symbolic - Libra ; लिब्रा

By

Published : Aug 6, 2019, 5:59 PM IST

सिडनी - फेसबुकला लिब्रा हे आभासी चलन सुरू करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वापरकर्त्यांच्या वित्तीय आकडेवारीचे कसे संरक्षण करण्यात येईल, असा सवाल गोपनीयतेचे नियमन करणाऱ्या जागतिक संस्थांनी फेसबुकला केला आहे.

गोपनीयतेचे नियमन करणाऱ्या संस्थांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोपियन युनियन, इंग्लंड, कॅनडा आणि आदी देशांमधील संस्थांचा समावेश आहे. या कंपन्यांनी फेसबुकला खुले पत्र लिहिले आहे. त्यामध्ये १२ हून अधिक चिंताजनक बाबींवर उत्तर द्यावे, अशी संस्थांनी मागणी केली आहे. फेसबुकने केंब्रिज अनालिटिका स्कँडलमध्ये वापरकर्त्यांचा डाटा लीक केला होता.

वैयक्तिक माहिती आणि वित्तीय माहिती यांच्या संमिश्रणाने वैयक्तिक गोपनीयतेची चिंता वाढणार आहे. वापरकरत्याच्या आर्थिक व्यवहाराची माहिती कुणालाही दिली जाणार नाही याची खात्री द्यावी, अशी नियामक संस्थांनी मागणी केली आहे. फेसबुकने जूनमध्ये लिब्राच्या लाँचिंगची घोषणा केली. लिब्रा हे डिजीटल वॉलेट असणार आहे. त्यातून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून वित्तीय सेवा दिल्या जाणार आहेत. गेल्या महिन्यात जी ७ ग्रुपच्या वित्तीय मंत्र्यांनीही डिजीटल बँकेबाबत इशारा दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details