नवी दिल्ली– पोस्ट विभागाने अल्पबचतीच्या योजनांची सुविधा पोस्ट कार्यालयांच्या विविध शाखांमधूनही देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातही पोस्टाच्या सर्व सुविधा मिळण्यासाठी विभागाने हा निर्णय घेतला आहे. यामधून पोस्टाचे देशातील जाळे आणखी बळकट होणार आहे.
शहरातील पोस्ट कार्यालयांप्रमाणेच गावातही मिळणार अल्पबचतीच्या सुविधा
ग्रामीण भागात पोस्टाचे जाळे आणखी बळकट करण्यासाठी शाखांमधूनही अल्पबचतीच्या योजना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोस्ट विभागाने म्हटले आहे. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये असलेल्या पोस्टांच्या शाखांमधून अल्पबचतीच्या योजनांच्या सेवा ग्राहकांना घेता येणार आहेत.
पोस्ट कार्यालयाच्या देशातील ग्रामीण भागात 1.31 लाख शाखा आहेत. या शाखांमधून पत्र पोहोचविणे, स्पीड पोस्ट, पार्सल, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर, ग्रामीण पोस्टल विमा योजना आदी सेवा देण्यात येतात. त्यामधून आवृत्ती ठेव योजना व सुकन्या समृद्धी योजनेकरताही गुंतवणूक स्वीकारण्यात येते.
ग्रामीण भागात पोस्टाचे जाळे आणखी बळकट करण्यासाठी शाखांमधूनही अल्पबचतीच्या योजना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोस्ट विभागाने म्हटले आहे. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये असलेल्या पोस्टांच्या शाखांमधून अल्पबचतीच्या योजनांच्या सेवा ग्राहकांना घेता येणार आहेत. यामध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी, मासिक उत्पन्न योजना व किसान विकास पत्र आदींचा समावेश आहे. गावात राहणाऱ्या लोकांना शहरी भागांप्रमाणेच पोस्ट कार्यालयांमधून बँकांसारख्या बचत सुविधा मिळणार आहेत.