महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

लसनिर्मितीकरता कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा; पुनावाला यांची बिडेन यांना विनंती - Serum Institute of India

कोरोनाविरोधात लशींचे उत्पादन करणाऱ्या सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आदरणीय पोट्स, जर आपल्याला खरोखर एकत्रितपणे विषाणुवर मात करायची असेल तर, अमेरिकेने लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवावी.

Poonawalla
आदार पुनावाला

By

Published : Apr 16, 2021, 11:07 PM IST

बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- केंद्र सरकारकडून लशींचा देशात पुरवठा होण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याचे समोर आले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ आदार पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना पत्र लिहून करोना लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्बंध उठविण्याची मागणी केली आहे.

कोरोनाविरोधात लशींचे उत्पादन करणाऱ्या सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आदरणीय पोट्स, जर आपल्याला खरोखर एकत्रितपणे विषाणुवर मात करायची असेल तर, अमेरिकेने लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवावी. अमेरिकेबाहेरील लस उद्योगांकडून तुम्हाला ही नम्र विनंती आहे. तुमच्या प्रशासनाला सविस्तर माहिती आहे.

हेही वाचा-सोलापूर : मागणी वाढल्याने ऑक्सिजनच्या दरात वाढ

लसीकरण मोहिमेवर परिणाम होण्याची भीती-

यापूर्वी पुनावाला यांनी जागतिक बँकेच्या कार्यक्रमात बोलतानाही कोरोना लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. संरक्षण कायद्यांतर्गत अमेरिकेने कच्च्या मालावर निर्बंध लागू केल्याने कोरोना लसीकरण मोहिमेवर परिणाम होईल, अशी भीती पुनावाला यांनी व्यक्त केली होती. उत्पादकांना खूप बॅग, फिल्टर आणि महत्त्वाच्या बाबी उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणार आहेत. मी तुम्हाला उदाहरण देतो. नोवावॅक्स लशीसाठी आम्हाला अमेरिकेकडून महत्त्वाचे घटक हवे आहेत. अमेरिकेने संरक्षण कायदा लागू केला आहे. त्यामध्ये स्थानिक लस उत्पादकांना लागणाऱ्या कच्च्या मालावर निर्बंध आणण्याचा समावेश आहे.

हेही वाचा-जिथं लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं राजकरण नको, धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना टोला

जुलै 2021 पर्यंत 30 कोटी डोस लागणार -

दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया ही लस उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. केंद्र सरकारने जुलै 2021 पर्यंत 30 कोटी डोस लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. हे लसीचे डोस कोरोनाच्या लढ्यातील आरोग्य कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने दिले जाणार आहे. भारतीय औषधी महानियंत्रक यांनी कोव्हिशिल्ड आणि बायोटेकच्या कोविक्सिनला आपत्कालीन स्थितीत वापरासाठी मंजुरी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details