नवी दिल्ली - पॉन्झी घोटाळा करून अनेकांना गंडविणाऱ्या हिरा ग्रुपची मालक नोव्हेरा शेखला सक्त आर्थिक अंमलबजावणी संचालनयाने दणका दिला आहे. तिची मालकी असलेल्या ९६ मालमत्तावर जप्ती आणली आहे.
पॉन्झी घोटाळा : नोव्हेरा शेखची २९९ कोटींचा मालमत्तेवर ईडीकडून टाच - cheating case
मनी लाँड्रिंग कायद्यानुसार नोव्हेरा शेखची २९९.९९ कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील मालमत्तेचा यात समावेश आहे. ही मालमत्ता शेतजमीन, प्लॉट, रहिवाशी इमारत, व्यावसायिक इमारत अशा स्वरुपात आहे. याशिवाय बँक खात्यामधील २२.६९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
मनी लाँड्रिंग कायद्यानुसार नोव्हेरा शेखची २९९.९९ कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ही मालमत्ता केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि आंध्रप्रदेशमधील मालमत्तेचा समावेश आहे. मालमत्ता शेतजमीन, प्लॉट, रहिवाशी इमारत, व्यावसायिक इमारत अशा स्वरुपात आहे. याशिवाय बँक खात्यामधील २२.६९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
हैदराबादमधील सेंट्रल क्राईम स्टेशनमध्ये शेख विरोधात पहिला एफआयआर नोंदविण्यात आला होता. त्यानंतर तिच्याविरोधात देशात अनेक ठिकाणी एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. तिच्यासह इतर आरोपीविरोधात बेकायदेशीररित्या पैसा गोळा करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हिरा ग्रुपच्या माध्यमामधून तिने १ लाख ७२ हजार गुंतणूकदारांकडून सुमारे ५ हजार ६०० कोटी रुपये गोळा केले. तिने फसवणूक करून घेतलेला पैसा हा अनेक शेल कंपनीत गुंतविल्याचे भासविले. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तिने लाखो जणांना फसविल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.