मुंबई –नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँकेची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. डीएचएफएल कंपनीने पंजाब नॅशनल बँकेची 3 हजार 688.58 कोटी रुपयांचे फसवणूक केली आहे. या फसवणुकीची माहिती पीएनबीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिली आहे.
डीएचएफएलकडून पंजाब नॅशनल बँकेची 3,688.58 कोटींची फसवणूक - डीएचएफएल न्यूज
डीएचएफएलच्या बुडित कर्ज खात्यामधून बँकेची 3 हजार 688.58 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पीएनबीने शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीने काही बनावट कंपन्यांमधून बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
पंजाब नॅशनल बँक

गेल्यावर्षी डीएचएफएलच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ईडी, एसएफआयओ या संस्थांच्या नजरेत डीएचएफएल आली आहे. या कंपनीवर येस बँकेत घोटाळा केल्याचाही आरोप आहे.