नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज झायडस बायोटेक पार्कमधील झायडस कॅडिलामध्ये उपस्थित राहिले होते. त्यांच्या उपस्थितीने आरोग्य क्षेत्रातील गरजेची मोठ्या प्रमाणात पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादजवळील झायडस कॅडिलाच्या उत्पादन प्रकल्पाला आज भेट दिली आहे. कोरोनाच्या लसीच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे शहराला भेट देत आहेत.
पंतप्रधानांच्या उपस्थितीने मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रातील गरजेची पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ही माहिती झायडस कॅडिलाने शेअर बाजाराला दिली आहे. झायडस कुटुंबातील २५ हजार झायडन्स (कर्मचारी) हे आत्मनिर्भर भारतच्या अभियानासाठी बांधील आहेत. देशाला सुरक्षित आणि परिणामकारक लस तसेच थॅरपेटिक, डायग्नोस्टिक्स दिली जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-झायडस कॅडिलाकडून झायकोव्ही-डी औषधाच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण