महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम झाल्याने पीएमसीचे संकट' - Nawab Maliq

आरबीआय आणि सरकारची हस्ततक्षेप करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायला पाहिजे. लोकांचा पैसा वाया जावू नये यासाठी त्यांनी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

नवाब मलिक

By

Published : Sep 24, 2019, 8:19 PM IST

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत पैसे अडकल्याने ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत. आरबीआय आणि सरकारने ग्राहकांचे पैसे बुडणार नसल्याची खात्री द्यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली आहे.

भाजपने चुकीचे आर्थिक धोरण राबविल्याने पीएमसीचे संकट उद्भवल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. आरबीआय आणि सरकारची हस्ततक्षेप करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायला पाहिजे. लोकांचा पैसा वाया जावू नये यासाठी त्यांनी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

हेही वाचा-काय आहेत पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध?

विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीदेखील पीएमसीच्या संकटाला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टीका केली. सरकारचे कमकुवत आणि चुकीचे आर्थिक धोरण आहे. सरकारच्या चुकीमुळे बँकेच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक खातेदाराने सावध राहायला पाहिजे, असे मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अशा प्रकारचा प्रसंग इतर बँकेच्या ग्राहकांवर येणार नसल्याची खात्री आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा-पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले

अनेक एनपीए प्रकरणांची माहिती न दिल्याने आरबीआयने पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. आरबीआयने पीएमसी बँकेच्या ग्राहकांना सहा महिन्यांसाठी केवळ १ हजार रुपये काढण्याची मर्यादा घातलेली आहे. बँकेत सुमारे ११ हजार कोटींच्या लोकांच्या मुदत ठेवी आहेत.

हेही वाचा-आरबीआयच्या निर्बंधाने पीएमसी बँकेचे ग्राहक चिंताग्रस्त; खोपोली, डोंबिवलीसह नवी मुंबईतील शाखेत गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details