महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पीएमसी बँक घोटाळा : वाधवान पिता-पुत्राला न्यायालयीन कोठडी - सक्त अंमलबजावणी संचालनालय

सक्त अंमलबजावणी संचालनालयाने एचडीआयएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश व त्याचा मुलगा सारंग यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपीची ईडी कोठडी वाढविण्यासाठी सक्त अंमलबजावणी संचालनलयाकडून मागणी करण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वाधवान पिता-पुत्र

By

Published : Oct 24, 2019, 9:53 PM IST

मुंबई - एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग यांना पीएमसी बँकेतील ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सक्त अंमलबजावणी संचालनालयाने एचडीआयएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश व त्याचा मुलगा सारंग यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपीची ईडी कोठडी वाढविण्यासाठी सक्त अंमलबजावणी संचालनलयाकडून मागणी करण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने वाधवान पिता-पुत्राला मागील महिन्यात अटक केली होती. त्यांच्यासह पीएमसीच्या बँक अधिकाऱयांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलेला आहे. वाधवान यांनी पीएमसी बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज थकविले. तरीही पीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकित कर्जाच्या माहिती बँकिंग नियमन संस्थांकडून दडवून ठेवल्याचा आरोप आहे.

हेही वाचा-'उद्योगानुकलतेच्या मानांकनात वाढ होण्याकरता जीएसटीत सोपेपणा आणू'

पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी विविध २१ हजार ४९ बनावट बँक खाती तयार केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडून प्रकरणाचा तपास केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details