मुंबई- पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यामधून उपचारासाठी पैसे काढता न आल्याने आणखी एका ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. मुरलीधर धारा असे मृत खातेदाराचे नाव आहे. गेल्या काही दिवासमधील पीएमसीच्या ग्राहकाचा हा चौथा मृत्यू आहे.
मृत खातेदार हे उत्तर पूर्व मुंबईमधील मुलूंड कॉलनीमधील रहिवाशी होते. त्यांना उपचारासाठी बँकेतून पैसे काढता आले नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सहा महिन्याच्या कालावधीत जास्तीत जास्त ४० हजार रुपये खात्यामधून काढता येतात.
उपचाराकरिताही पैसे काढता आले नाहीत: पीएमसीच्या चौथ्या खातेदाराचा मृत्यू - Punjab & Maharashtra Cooperative
मृत खातेदार हे उत्तर पूर्व मुंबईमधील मुलूंड कॉलनीमधील रहिवाशी होते. सोमवारी संजय गुलाटी यांचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला. त्यांच्या पीएमसी बँकेत ९० लाख रुपयाच्या ठेवी आहेत.
पीएमसी बँक
सोमवारी संजय गुलाटी यांचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला. त्यांच्या पीएमसी बँकेत ९० लाख रुपयाच्या ठेवी आहेत.
Last Updated : Oct 18, 2019, 11:43 PM IST