नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी आज विविध विषयावर चर्चा केली. यामध्ये कोरोनाच्या काळातील कार्यसंस्कृती, डाटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षा अशा विविध विषयांचा समावेश आहे. ही चर्चा फलदायी झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
गुगलकडून शिक्षण, डिजीटल शिक्षण आणि डिजीटल देयकाच्या क्षेत्रात करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. ते म्हणाले, की सुंदर पिचाई यांच्याबरोबर आज सकाळी फलदायी चर्चा झाली. आम्ही विविध व्यापक विषयावर चर्चा केली. यामध्ये तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने तरुण, आंत्रेप्रेन्युअर आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे, यावर विशेषत: चर्चा करण्यात आली.