महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात भारताची व्यापारी तूट कमी करण्यावर चर्चा

दोन्ही देशामध्ये असंतुलित व्यापार आहे, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी-जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. आर्थिक सुधारणा करण्यासाठी दुसऱ्यांदा बहुमत मिळाल्याचे पंतप्रधानांनी शी-जिनपिंग यांना सांगितले.

By

Published : Oct 12, 2019, 12:33 PM IST

पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी-जिनपिंग

महामल्लपूरम (तामिळनाडू) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी-जिनपिंग यांच्यात व्यापार वाढविण्याबाबत द्विपक्षीय चर्चा झाली. तसेच भारताची चीनबरोबर असलेल्या व्यापारी तुटीबाबतही चर्चा करण्यात आली. शुक्रवारी दोन दिवसीय असेल्या अनौपचारिक भेटीचा पहिला दिवस होता.

परराष्ट्र सचिव विजय के. गोखले यांनी शी-जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची माहिती दिली. ते म्हणाले, दोन्ही नेत्यांनी त्यांच्या राष्ट्राच्या धोरणाबाबत तसेच त्यांच्या प्राधान्याबाबत चर्चा केली. या चर्चेत व्यापार आणि अर्थव्यव्यवस्थेसंदर्भातील मुद्द्यांचाही समावेश होता.


दोन्ही नेत्यांनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करता येवू शकते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देश हे व्यापाराचे प्रमाण आणि मूल्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन देवू शकतात. दोन्ही देशामध्ये असंतुलित व्यापार आहे, त्याबाबतही चर्चा झाली आहे. आर्थिक सुधारणा करण्यासाठी दुसऱ्यांदा बहुमत मिळाल्याचे पंतप्रधानांनी शी-जिनपिंग यांना सांगितले.


दहशतवादाच्या प्रश्नावर दोन्ही देश काम करू शकतात, त्यासंदर्भातही चर्चा झाली. दोन्ही देशांचा विस्तार मोठा आहे. तरीही मूलगामीपणा आणि दहशतवाद हे दोन्ही देशांच्या बहुसंस्कृती बहुधर्मीय समाजाच्या एकसंधपणावर परिणाम करू शकणार नाही, असा दोन्ही नेत्यांनी विश्वास व्यक्त केला. दोन्ही नेते शनिवारी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. ही चर्चा समोरासमोर होणार आहे. दोन्ही नेते इतर सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुक्त असणार आहेत. मोदी -जिनपिंग यांच्यात गेल्या वर्षी चीनमधील वुहान येथे पहिली अनौपचारिक बैठक पार पडली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details