महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आरबीआयमधून पैसे चोरले; राहुल गांधींचा आरोप - Issue of RBI Reserve fund

आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आरबीआयचा राखीव निधी थेट अर्थव्यवस्थेत येणार आहे. यावर राहुल गांधींनी ट्विट केले आहे.

संग्रहित - राहुल गांधी

By

Published : Aug 27, 2019, 2:56 PM IST

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी केंद्र सरकारला हस्तांतिरत करण्यात येत असल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. हा प्रकार म्हणजे पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आरबीआयमधून पैसे चोरल्याचा त्यांनी आरोप केला. स्वत: केलेले आर्थिक संकट दूर कसे करायचे, हे पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहित नसल्याची टीका राहुल गांधींनी केली.


आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आरबीआयचा राखीव निधी थेट अर्थव्यवस्थेत येणार आहे. यावर राहुल गांधींनी ट्विट केले आहे.


काय म्हटले राहुल गांधींनी ट्विटमध्ये -


आरबीआयमधून पैसे घेणे म्हणजे औषधपेटीमधून उपचाराची पट्टी चोरून बंदुकीची गोळी लागलेल्या जखमेवर उपचार करण्यासारखे आहे. आरबीआयमधून पैसे चोरल्याने काम होणार नाही. राहुल गांधींनी ट्विट करताना आरबीआयलूटेड हा हॅशटॅग वापरला आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी आरबीआयचे पैसे घेण्यावरून आश्चर्य व्यक्त केले आहे. ही वित्तीय सावधानता आहे की वित्तीय आत्महत्या आहे, असा त्यांनी सवाल केला आहे. अर्थसंकल्पाच्या हिशोबात जो फरक होता तेवढे १.७६ लाख कोटी रुपये सरकार आरबीआयकडून उधार घेत आहे. हा निव्वळ योगायोग आहे का? असा त्यांनी सवाल केला. हे १.७६ लाख कोटी भाजपच्या जवळच्या मित्रांसाठी वापरण्यात येणार आहे का, असाही त्यांनी सवाल केला.

भारताच्या बँकेला लुटण्यात आल्याचे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी ट्विट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details