नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात अनेपेक्षितपणे माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची वर्णी लागली आहे. गोयल यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा आज पदभार घेतला आहे. यावेळेस त्यांच्यासोबत सुरेश प्रभू हेदेखील होते. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध पेटल्याने जागतिक आर्थिक मंचावर तणावाची स्थिती आहे. अशा स्थितीत पियूष गोयल यांच्यासमोर विविध आव्हाने आहेत.
नवनिर्वाचित केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. त्यांनी विश्वास ठेवून मला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची संधी दिली आहे. गोयल हे माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमेवत मंत्रालयात आले होते. पुढे ते म्हणाले, की मला वरिष्ठ सहकारी प्रभू यांच्याकडून खूप काही शिकावे लागणार आहे. त्यांच्याकडून मी मागर्दर्शन आणि सहकार्य घेत राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी सुरेश प्रभू यांनी गोयल यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला.
ही आहेत नव्या केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांसमोर आव्हाने -