बंगळुरू -स्टार्टअप पिक्सेलने 'आनंद' उपग्रहाचे २८ फेब्रुवारील नियोजित प्रक्षेपण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे हा निर्ण घेतल्याचे पिक्सेलने म्हटले आहे.
उपग्रहाची चाचणी करताना सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे पीएसएलव्ही सी ५१ मिशनचे लाँचिंग न करण्याचा पिक्सेलने निर्णय घेतला आहे. उपग्रह तयार करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन प्रयत्न करण्यात आले आहेत.
उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. सध्या आम्हाला पूर्ण आत्मविश्वास नाही. त्यामुळे आम्ही प्रक्षेपण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही उपग्रहाचे सॉफ्टेवअरचे पुनर्मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात पुन्हा चाचणी करून प्रक्षेपण करणार आहोत. आनंद हा पृथ्वीच्या कमी उंचीवरील कक्षेत (एलईओ) उपग्रह सोडण्यात येणार आहे.