महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

औषधी क्षेत्राला आत्मनिर्भर होण्याकरता लागणार वेळ; उद्योगाचे सरकारला पत्र - Pharma industries issues in lockdown

गेल्या तीन दिवसात औषधांचे उत्पादन विस्कळित झाल्याचे उद्योग प्रतिनिधींनी औषधी विभाग आणि औषध निर्यात प्रोत्साहन परिषदेचे सचिवांना पत्र लिहिले आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालय आणि डीजीएफटीलाही देण्यात आले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jun 29, 2020, 4:57 PM IST

नवी दिल्ली – चीनकडून आयात करण्यात आलेल्या मालाकरता उत्पादन शुल्काची कठोर तपासणी आणि परवानगी लवकर मिळत नसल्याचा मोठा फटका औषधी निर्माण उद्योगाला बसत आहे. या उद्योगाच्या प्रतिनिधींनी जहाज बंदर आणि विमानतळावर अडकलेल्या मालाला लवकर परवानगी द्यावी, अशी सरकारकडे मागणी केली आहे.

गेल्या तीन दिवसात औषधांचे उत्पादन विस्कळित झाल्याचे उद्योग प्रतिनिधींनी औषधी विभागाला लिहिले आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालय आणि डीजीएफटीलाही देण्यात आले आहे. या पत्रात औषधी उद्योगाला आत्मनिर्भर होण्याकरता वेळ लागणार असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यासाठी सवलतीच्या योजनांमधून फार्म पार्क्स अशा योजना टप्प्याटप्प्याने द्याव्या लागतील, असे औषधी उद्योगाने म्हटले.

अत्यंत महत्त्वाचे घटक (कि स्टार्ट मटेरियल), क्रियाशील घटकद्रव्ये (एपीआय) यांना अजूनही परवानगी का देण्यात आली नाही, हे मुळीच उद्योगाला समजले नाही. कोरोनाच्या संकटात अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पल्स ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर तसेच ग्लुकोमीटर आणि स्ट्रीपदेखील दिल्ली विमानतळावर अडकून पडल्याचे फार्मासएक्सलिलचे चेअरमन दिनेश दुआ यांनी सांगितले.

जर आयातीच्या मालाला परवानगी मिळाली नाही तर उद्योगाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. उत्पादन शुल्काकडून परवानगी न मिळणे हे मानवनिर्मित विस्कळितपणा आहे, अशा शब्दात औषधी उद्योगाने नाराजी व्यक्त केली आहे. जर उत्पादन शुल्काकडून परवानगी मिळाली नाही तर औषधी उत्पादन व वितरणावर 90 ते 100 टक्के परिणाम होणार असल्याची भीती दुआ यांनी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत उत्पादनात अडथळा येणार नाही, यासाठी सरकारने आश्वस्त करावे, असेही उद्यागाने पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असल्याने देशात चिनी मालावर बहिष्कार टाकावा, अशी व्यापारी संघटनांसह नागरिकांमधून मागणी होत आहे. मात्र, अनेक उद्योग हे कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून असल्याचे स्पष्ट होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details