वॉशिंग्टन- अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशा आपत्कालीन स्थितीत कोरोना लसीचा वापर करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी औषध कंपनी फायझरने अमेरिकेच्या नियामक संस्थेकडे केली आहे. फायझरकडून पुढील महिन्यात कोरोना लसीचे मर्यादित डोस उपलब्ध होणार आहेत.
फायझर कंपनीने जर्मनीची भागीदार कंपनी बायोनटेक कंपनीच्या मदतीने कोरोनावरील लशीची निर्मिती केली आहे. ही लस कोरोना महामारीवर ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. संरक्षण आणि सुरक्षितता असल्याने फायझरची लस आपत्कालीन वापरासाठी पात्र असली पाहिजे. पूर्ण लशीची चाचणी होण्यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासन लसीच्या वापरासाठी परवानगी देऊ शकते.
तज्ज्ञांचा हा आहे सल्ला-
जगभरासह अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नियामक संस्थेवर लशीची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यावर दबाव आहे कोरोनावरील मॉर्डना लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी अमेरिकेत यशस्वी ठरली आहे. अमेरिकेच्या संसर्गजन्य रोगांचे तज्त्र डॉ. अँथोनो फॉकी म्हणाले, की फायझरने लसीबाबत घोषणा केली असली तरी मास्क आणि इतर उपाययोजना टाळणे खूप घाईचे ठरेल. आम्हाला सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना दुप्पट करण्याची गरज आहे.