महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पेट्रोलच्या किमतीचा उच्चांक; मुंबईत डिझेलचा दर ८१ रुपयांहून अधिक - मुंबई पेट्रोल न्यूज

पेट्रोलचे दर प्रति लिटर २३ पैशांनी वाढले आहेत तर डिझेलचे दर २६ पैशांनी वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८४.२० रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ७४.३८ रुपये आहे.

पेट्रोल दर न्यूज
पेट्रोल दर न्यूज

By

Published : Jan 7, 2021, 10:41 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोलचा दर प्रति लिटर आज दिल्लीत प्रति लिटर ८४.२० रुपयांहून अधिक आहे. हा आजपर्यंतचा सर्वाधिक दर आहे. तर मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ८१ रुपयांहून अधिक आहे.

पेट्रोलचे दर प्रति लिटर २३ पैशांनी वाढले आहेत तर डिझेलचे दर २६ पैशांनी वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८४.२० रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ७४.३८ रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९०.८३ रुपये तर डिझेलचा दर ८१.०७ रुपये आहे.

हेही वाचा-दिलासादायक! नोकरी भरतीत डिसेंबरमध्ये १४ टक्क्यांनी वाढ

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने बुधवारपासून पेट्रोल व डिझेलचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलचे दर बुधवारी प्रति लिटर २६ पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर २५ पैशांनी वाढले आहेत. यापूर्वी दिल्लीत पेट्रोलच्या दराने ४ ऑक्टोबर २०१८ ला प्रति लिटर ८४ रुपये हा उच्चांक गाठला होता. तर डिझेलचा दर त्यादिवशी प्रति लिटर ७५.४५ रुपये होता.

हेही वाचा-सेबीने ७ संस्थांवरील रद्द केले निर्बंध

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांकडून जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे दररोज किरकोळ विक्रीतील पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये बदल करण्यात येतात. कोरोना महामारीत मागणी मंदावल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमती अधिक काळ स्थिर राहिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details