नवी दिल्ली- देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे मागणी कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर घसरले आहेत. त्यामुळे सरकारी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर घसरले आहेत.
पेट्रोलचे दर प्रति लिटर १५ पैशांनी तर डिझेलचे दर १९ पैशांनी दिल्लीमध्ये घसरले आहेत. पेट्रोलचा दर दिल्लीत प्रति लिटर ८१.४० रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर प्रति लिटर ७२.३७ रुपये आहे. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलचे दर घसरले आहेत. तर सातव्यांदा डिझेलचे दर सप्टेंबरमध्ये घसरले आहेत.
मागील महिन्यात पेट्रोलचे दर वाढले होते. तर डिझेलचे दर काही दिवसांसाठी स्थिर झाले होते. तसेच काही दिवस डिझेलचे दर काही दिवसांसाठी घसरले होते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटच्या माहितीनुसार पेट्रोलचा प्रति लिटर दर कोलकात्यात ८२.९२ रुपये, मुंबईमध्ये ८८.०७ रुपये आणि चेन्नईमध्ये ८४.४४ रुपये आहे. डिझेलचा दर या महानगरांमध्ये अनुक्रमे ७२.३७ रुपये, ७५.३७ रुपये, ७८.८५ रुपये आणि ७७.३३ रुपये आहे.
गेल्या काही दिवसांत खनिज तेलाचा दर प्रति बॅरल हा ४० डॉलरहून कमी झाले होते. सध्या प्रति बॅरलचा दर हा ४१ डॉलर आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर कमी अथवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी होत आहेत.