महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ

देशात पहिल्यांदाच पेट्रोलचे दर शंभरीजवळ पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९५.४६ रुपये आहेत.

पेट्रोल किंमत न्यूज
पेट्रोल किंमत न्यूज

By

Published : Feb 15, 2021, 2:52 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग सातव्या दिवशी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलचे दर प्रति लिटर २९ पैशांनी तर पेट्रोलचे दर २६ पैशांनी दिल्लीत वाढले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८८.८९ रुपये तर डिझेलचे दर ७९.३५ रुपये आहेत. गेल्या सात दिवसांत पेट्रोलचे दर प्रति लिटर २.०६ रुपये तर डिझेलचे दर २.५६ रुपयांनी वाढले आहेत.

पेट्रोल-डिझेल दरवाढीतील महत्त्वाचे मुद्दे-

  • मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९५.४६ रुपये आहेत.
  • देशात पहिल्यांदाच पेट्रोलचे दर शंभरीजवळ पोहोचले आहेत.
  • डिझेलचे दर मुंबईत ८६.३४ रुपये आहेत.
  • इतर महानगरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९० रुपयांजवळ पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर ८० रुपयांजवळ पोहोचले आहेत.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या काही दिवसांत प्रति बॅरल ६३.५ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत.
  • २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर १९ वेळा वाढले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर ५.२८ रुपये तर डिझेलचे दर ५.२८ रुपये आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details