महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महागाईचा 'कळस': नऊ दिवसात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महाग - petrol price latest news

सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर दिल्लीत प्रति लिटर २५ पैशांनी वाढले आहेत. दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८९.५४ रुपये आहे.

पेट्रोल डिझेल दरवाढ
पेट्रोल डिझेल दरवाढ

By

Published : Feb 17, 2021, 2:58 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग नवव्या दिवशी दरवाढ सुरू राहिली आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधनाच्या किमती वाढत आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९६ रुपये आहे.

सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर दिल्लीत प्रति लिटर २५ पैशांनी वाढले आहेत. दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८९.५४ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ७९.९५ रुपये आहे.

हेही वाचा-'देशाने पर्यायी इंधनाचा स्वीकार करण्याची हीच वेळ'

  • पेट्रोलचे दर ९ फेब्रुवारीपासून प्रति लिटर २.५९ रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर २.८२ रुपयांनी वाढले आहेत.
  • मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९६ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८६.९८ रुपये आहे.
  • मुंबईत फार कमी कालावधीत पेट्रोलचे दर शंभरीजवळ पोहोचले आहेत.
  • राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये प्रिमीयम पेट्रोलचे दर १०० रुपयांहून अधिक आहेत.
  • जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे बुधवारी प्रति बॅरल ६३.५ डॉलरवर पोहोचले आहेत. त्यामुळे देशात सार्वजनिक कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविले आहेत.
  • पेट्रोल आणि डिझेलचे दर २०२१ मध्ये २१ वेळा वाढविण्यात आले आहेत. पेट्रोलचा दर प्रति लिटर ५.८३ रुपये तर डिझेलचा दर ६.०८ रुपये आहे.

हेही वाचा-रेलटेलच्या भागविक्रीत पहिल्याच दिवशी २.६४ पटीने अधिक अर्जभरणा

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. नुकसान टाळण्याकरिता येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढणार असल्याचे तेल कंपन्यांमधील सूत्राने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details