नवी दिल्ली - एक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या किमती दिल्लीत प्रति लिटर २७ पैशांनी वाढून ९२.८५ रुपये आहेत. तर डिझेलची किंमत प्रति लिटर २९ पैशांनी वाढून ८३.५१ रुपये आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरकारी कंपन्यांकडून इंधनाचे दर रोज बदलण्याऐवजी एक दिवसाआड बदलण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर मंगळवारी प्रति लिटर २५ ते ३० पैशांनी वाढले होते. रविवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर २४ पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर २७ पैशांनी वाढले होते. तर शनिवारी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहिले होते. तर त्यापूर्वी शुक्रवारी पेट्रोल व डिझेलचे दर वाढले होते.
हेही वाचा-कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 'ही' कंपनी कुटुंबाला १ कोटीपर्यंत करणार मदत
एकाच महिन्यात दहा वेळा इंधन दरात वाढ-