महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात; जाणून घ्या आजचे दर - Diesel rate

नवी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७४.९८ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल ८०.५८ रुपये, कोलकात्यात ७७.५८ रुपये आणि चेन्नईत ७७.८९ रुपये प्रति लिटर आहे.

Petrol, diesel prices cut
पेट्रोल डिझेल दर कपात

By

Published : Jan 20, 2020, 12:02 PM IST

नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग पाचव्या दिवशी कमी झाल्या आहेत. पेट्रोलचे दर १० ते १२ पैशांनी कमी झाले आहेत. तर डिझेलचे दर १९ ते २० पैशांनी कमी झाले आहेत.

नवी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७४.९८ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल ८०.५८ रुपये, कोलकात्यात ७७.५८ रुपये आणि चेन्नईत ७७.८९ रुपये प्रति लिटर आहे. डिझेलचे दर नवी दिल्लीत कमी होवून ६८.२६ रुपये झाले आहेत. तर मुंबईत ७१.५७ रुपये, कोलकात्यात ७०.६२ रुपये आणि चेन्नईत ७२.१३ रुपये प्रति लिटर डिझेल आहे.

हेही वाचा-धक्कादायक! वर्ष २०१८ मध्ये १२,९३६ बेरोजगारांच्या आत्महत्या


गेल्या दहा दिवसात पेट्रोलचे दर ९८ पैशांनी कमी झाले आहेत. तर डिझेलचा दर १ रुपया ८५ पैशांनी कमी झाले आहेत. सरकारी खनिज तेल विपणन कंपन्यांकडून कच्च्या तेलाच्या किमतीचा रोज आढावा घेतला जातो. कंपन्यांनी लागू केलेले पेट्रोल-डिझेलचे दर सकाळी सहा वाजल्यापासून देशभरातील सर्व पेट्रोल पंपावर लागू होतात.

हेही वाचा-जागतिक आर्थिक मंचात केंद्रीय वाणिज्य मंत्री भारतीय प्रतिनिधींचे करणार नेतृत्व

ABOUT THE AUTHOR

...view details