नवी दिल्ली - सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीला ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशाच्या प्रमुख चार महानगरांमध्ये पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त झाले आहे. इंडियन ऑईल वेबसाईटच्या आकेडवारीनुसार पेट्रोलचा दर दिल्लीत ७३.७६ रुपये, कोलकातामध्ये ७६.४० रुपये तर मुंबईत ७९.४० रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७६.६१ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ६६.०९ रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये ६९.२७ रुपये, मुंबईत ७०.१४ रुपये आणि चेन्नईत ७१.६८ रुपये असा दर आहे.
हेही वाचा-देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पेट्रोलियम कंपनीचे होणार खासगीकरण; बीपीसीएलच्या पूर्ण खासगीकरणाची सरकारकडून तयारी
जागतिक बाजारपेठेत आज कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत ५८.१२ डॉलर झाली आहे. यापूर्वी कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर हा ७१.९५ प्रति डॉलरवर पोहोचला होता. सौदीमधील दोन तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती. मात्र, सध्या कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल १४ डॉलरने कमी झाले आहेत.
हेही वाचा-सरकार खासगीकरण करणार असल्याने बीपीसीएलला फटका; शेअरमध्ये ३ टक्के घसरण