महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनात महागाईचा कहर : पेट्रोल डिझलमध्ये दोन रुपयांची दरवाढ - Latest petrol diesel rate news

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असले तरी, नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

petrol-diesel-hike-to-2-rupees-per-litre-in-mumbai
पेट्रोल डिझलमध्ये दोन रुपयांची दरवाढ

By

Published : Jun 1, 2020, 6:49 PM IST

Updated : Jun 1, 2020, 7:46 PM IST

मुंबई - राज्यात पेट्रोल डिझेलचे दर हे दोन रुपयांनी प्रतिलिटर वाढले आहेत. ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही, असा सूर जनतेमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे काहींनी या कोरोनाच्या महामारीमध्ये आरोग्य सेवेसाठी ही दरवाढ योग्य असल्याचे म्हटले आहे.

मुंबईसह ठाण्यातही पेट्रोल व डिझेल दोन रुपयांनी महाग होणार आहे. मागील दोन महिन्यात सर्व व्यवसाय ठप्प आहेत. लोकांकडे पोट भरण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा वेळी सरकारकडून पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. पेट्रोल-डिझेल हे अत्यावश्यक असल्याने सर्वसामान्यांना त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले बजेट कोसळणार असल्याचेदेखील सांगितले.

ठाण्यातील रविवार आणि आजचे दर खालीलप्रमाणे-

रविवारचा दर (रु)
पेट्रोल - 76.36
डिझेल - 66.26

आजचा दर
पेट्रोल - 78.38
डिझेल - 68.27

Last Updated : Jun 1, 2020, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details