नवी दिल्ली - एक दिवसाच्या विश्रांतीनंर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २३ पैशांनी वाढून ९३.४४ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर २५ पैशांनी वाढून ८४.३२ रुपये आहेत.
संपूर्ण देशात इंधनाचे दर प्रति लिटर २० ते २७ पैशांनी वाढले आहेत. मात्र, किरकोळ विक्रीत इंधनाचे दर हे स्थानिक करानुसार भिन्न असणार आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९९.७१ रुपये आहे. यापूर्वीच महाराष्ट्रातील परभणीसह राजस्थान, मध्यप्रदेशमधील शहरांमध्ये इंधनाच्या दराने प्रति लिटर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मे महिन्यात १३ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर एकूण प्रति लिटर ३.०४ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ३.५९ रुपयांनी वाढले आहेत.
हेही वाचा-विदेशात बेपत्ता झालेल्या मेहुल चोक्सीचा शोध; सीबीआय इंटरपोलची घेणार मदत