नवी दिल्ली- डिजीटल देयक व्यवहार आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने विदेशात 21 हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी केले आहेत. हे कॉन्स्ट्रेटर मे महिन्याच्या आठवड्यात भारतामध्ये उपलब्ध होणार आहेत.
ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करण्यात आल्याची माहिती पेटीएमच्या प्रवक्त्याने माध्यमांना दिली. प्रवक्त्याने म्हटले, की पेटीएम फाउंडेशनने संकटकाळात दिलासा देण्यासाठी 21,000 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी केले आहेत. कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम कोरोनाच्या काळात उपाययोजना करण्यासाठी योगदान देत आहे.
भारतात आणण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर हे सरकारी रुग्णालय, कोव्हिड केअर सुविधा, खासगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि रहिवाशी कल्याण संघटनांना देण्यात येणार आहेत. ऑक्सिजन फॉर लाईफ कॅम्पेनंतर्गत पेटीएम फाउंडेशनच्या वेबसाईटवर एनजीओ खासगी रुग्णालये हे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरच्या खरेदीसाठी विनंती करू शकतात, असे प्रवक्त्याने म्हटले आहे.