नवी दिल्ली - गेल्या पाच वर्षात सेवा सुधारल्याने रेल्वे प्रवाशांना कोणताही त्रास होत नसल्याचे केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले. येत्या काही वर्षात भारत हा रेल्वे डबे निर्मितीचे हब होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
गोयल यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशातील स्वच्छ रेल्वे स्टेशनचा नवी दिल्लीत अहवाल प्रसिद्ध केला. यावेळी बोलताना गोयल म्हणाले, गेल्या पाच वर्षात रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव बदलला आहे. लोकांना प्रवासात कोणताही त्रास होत नाही. त्यांना आरामात प्रवास करता येतो.
पुढे ते म्हणाले, स्वच्छतेचे आपल्या जीवनात महत्त्व आहे. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला स्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद दिला. हे गांधींना सर्वात मोठे अभिवादन आहे. देशातील ६ हजार ५०० रेल्वे स्टेशनवर जनजागृतीसाठी स्वच्छता अभियानाचा उपक्रम हाती घेण्यात आला.
हेही वाचा-बुडित कर्जाचे आव्हान; २०२० पर्यंत बँकांचे ८ टक्क्यापर्यंत घसरू शकतात शेअर