बंगळुरू- कर्नाटकमधील अॅथोरिटी ॲडव्हान्स ऑफ रुलिंगने जीएसटीच्या दराबाबत एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. परोठावर प्रक्रिया केल्याने 18 टक्के जीएसटी कर लागू होतो, तर खाण्यासाठी तयार असलेल्या (रेडी टू इट) चपातीवर पाच टक्के जीएसटी लागू होतो.
फ्रेश फूड या कंपनीने जीएसटीच्या दराबाबत एएआरच्या खंडपिठाकडे अर्ज दाखल केला होता. यामध्ये कंपनीने संपूर्ण गव्हापासून तयार केलेला परोठा आणि मलबार परोठ्यावर 1905 या शीर्षकाखाली जीएसटीचा पाच टक्के दर लागू होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना एएआरच्या खंडपिठाने म्हटले की, चपात्या हा पूर्णपणे गव्हापासून तयार होणारा पदार्थ आहे. ते तयार असलेले अन्न (रेडी टू इट) या वर्गवारीत येते.