मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातून नागरी विमान सेवा सुरू करण्यासाठी सरकार बांधील असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळावर संरक्षण मंत्रालयाचे पूर्ण नियंत्रण आहे.
रत्नागिरीच्या नागरी विमान सेवेचा लवकरच शुभारंभ - सुरेश प्रभू - Ratnagiri Airport
रत्नागिरीतील नागरी विमानतळ करण्यासाठी राज्य सरकार, संरक्षण मंत्रालय आणि विमान प्राधिकरणाशी चर्चा सुरू असल्याचे सुरेश प्रभुंनी सांगितले. प्रादेशिक भागांना जोडण्यात येणाऱ्या योजनेची निविदा तिसऱ्या टप्प्यावर आहेत.
सुरेश प्रभू
रत्नागिरीतील नागरी विमानतळ करण्यासाठी राज्य सरकार, संरक्षण मंत्रालय आणि विमान प्राधिकरणाशी चर्चा सुरू असल्याचे सुरेश प्रभुंनी सांगितले. प्रादेशिक भागांना जोडण्यात येणाऱ्या योजनेची निविदा तिसऱ्या टप्प्यावर आहेत. या योजनेत रत्नागिरी-मुंबई-रत्नागिरी वाहतूक सेवेने जोडण्यात येणार आहेत.
विमानतळ प्राधिकरण आणि एमआयडीसी ही उड्डाण ३.१ साठी काम करणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. त्याबाबत मंगळवार करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.