नवी दिल्ली - प्राप्तीकर भरण्यासाठी करदात्यांना पॅन कार्ड व आधार कार्डची माहिती द्यावी लागते. यापुढे आधार कार्ड असले तरी प्राप्तीकर भरता येणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे.
प्राप्तीकर भरण्याच्या नियमात सुलभता आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून आधार कार्ड असले तरी प्राप्तिकर भरण्याची परवानगी देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी करदात्यांना पॅनकार्ड हे आधार कार्डशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले होते. अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही प्राप्तीकर विभागाने दिला होता.