मुंबई- विदेशातून देशात होणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण घसरून ४२ टक्के झाले आहे. हे प्रमाण डिसेंबर २०२० मध्ये १.४५ अब्ज डॉलर असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
मागील आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये विदेशातून देशात २.५१ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. भारतीय कंपन्यांची नोव्हेंबर २०२० मध्ये थेट विदेशात गुंतवणूक १.०६ अब्ज डॉलर होती. हे प्रमाण नोव्हेंबर २०१९ तुलनेत २७ टक्क्यांनी कमी होते.
हेही वाचाप्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर ग्रीन कर; केंद्राचा प्रस्ताव
- भारतीय कंपन्यांकडून शेअरच्या स्वरुपात थेट विदेशात गुंतवणूक ही ७७५.४१ दशलक्ष डॉलर इतकी होती. तर ३८२.९१ दशलक्ष डॉलर ही कर्जाच्या स्वरुपात होती.
- २८७.६३ दशलक्ष डॉलर ही गॅरंटीच्या स्वरुपात होती.
- या महत्त्वाच्या गुंतवणुकदारांमध्ये ओएनजीसी विदेशने १३१.८५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक म्यानमार, रशिया, व्हिएतनाम, ब्रिटिश व्हर्जिन इसलँडसह आदींचा समावेश आहे.
- इन्टास फार्माने ७५.२२ दशलक्ष डॉलरची युकेमध्ये गुंतवणूक केली आहे.
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आयर्लंडमध्ये २७.७७ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प: कृषी क्षेत्राचा वित्त पुरवठा वाढण्याची शक्यता