महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

देशात 'या' पदासाठी ९३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध - jobs opportunities in India

भारतीय अ‌ॅनालिटिक्स स्टार्टअपची वाढती संख्या व या क्षेत्रात वाढलेली गुंतवणूक या कारणांनी अ‌ॅनालिटिक्स फंक्शनमध्ये नोकऱ्यांची संख्या वाढल्याचे ग्रेट लर्निंग कंपनीने म्हटले आहे. या क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ८२ हजार ५०० इतके होते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Oct 7, 2020, 4:35 PM IST

बंगळुरू - कोरोना महामारीत नोकऱ्यांचे प्रमाण आणि संधी कमी झाल्या आहेत. असे असले तरी देशात ऑगस्टअखेर डाटा सायन्समध्ये ९३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध राहिल्या होत्या, ही माहिती शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी ग्रेट लर्निंगने दिली आहे.

कोरोना महामारीतही अ‌ॅनालिटिक्स फंक्शनच्या (डाटा सायन्स) नोकऱ्यांमध्ये उत्साह आणि आशावाद कायम दिसून येत आहे. अ‌ॅनालिटिक्स फंक्शनच्या क्षेत्रात जगभरातील नोकऱ्यांमध्ये भारताचा ९.८ टक्के हिस्सा आहे. तर मागील वर्षी जानेवारीत भारताचा अ‌ॅनालिटिक्स फंक्शनमध्ये ७.२ टक्के हिस्सा होता. या क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ८२ हजार ५०० इतके होते. तर गतवर्षी फेब्रुवारीमध्ये १ लाख ९ हजार डाटा सायन्समध्ये नोकऱ्या होत्या, ही माहिती ग्रेट लर्निंग कंपनीने दिली आहे.

हेही वाचा-एच-१बी व्हिसाच्या नव्या नियमाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे होणार नुकसान

भारतीय अ‌ॅनालिटिक्स स्टार्टअपची वाढती संख्या व या क्षेत्रात वाढलेली गुंतवणूक या कारणांनी अ‌ॅनालिटिक्स फंक्शनमध्ये नोकऱ्यांची संख्या वाढल्याचे ग्रेट लर्निंग कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-रिलायन्स रिटेलमध्ये 'ही' कंपनी करणार ५ हजार ५१२.५ कोटींची गुंतवणूक

एवढे मिळते डाटा सायन्समध्ये वेतन-

अ‌ॅनालिटीक नोकऱ्यांमध्ये देशात सर्वाधिक बंगळुरूमध्ये नोकऱ्या आहेत. त्यापाठोपाठ नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये नोकऱ्या आहेत. डाटा सायन्स व्यावसायिकांना देशात वार्षिक ९.५ लाख रुपये वेतन आहे. तर दहा वर्षांचा अनुभव असलेल्या डाटा सायन्स व्यावसायिकांना वार्षिक २५ ते ५० लाख रुपये वेतन आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details