नवी दिल्ली - देशातील १ हजारांहून अधिक आचारींनी पाककृतीत संपृक्त स्निग्धांशमुक्त (ट्रान्स फॅट) तेलाचा वापर करणार अशी शपथ घेतली. त्यांनी आठव्या आंतरराष्ट्रीय आचारी परिषदेत (आयसीसी) सरकारच्या 'ईट राईट इंडिया'ला पाठिंबा दिला. या परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी संपृक्त स्निग्धांशमुक्त तेलाच्या लोगोचे अनावरण केले.
आंतरराष्ट्रीय आचारी परिषदेतून भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ईट राईट इंडियाच्या मोहिमेला चालना देण्यात आली. यावेळी हर्षवर्धन यांनी 'शेफ ५ ट्रान्स फॅट फ्री' या घोषणेचे अनावरण केले. हर्षवर्धन यांनी संपृक्त स्निग्धांश विरहित उपक्रमाची माहितीपुस्तिका प्रसिद्ध केली. 'संपृक्त स्निग्धांश मुक्त पाककृती' हा जाहीरनामा पाच आचारींना देण्यात आला.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी संपृक्त स्निग्धांश मुक्त पदार्थ तयार करणाऱ्या १० बेकरींच्या मालकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रीन पर्पल मोहिमेच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले. यामधून आचारींनी (शेफस) अन्न सुरक्षेच्या कायदेशीर आवश्यकतांची पूर्तता करणे आणि पाककलेत शाश्वत पद्धतीचा वापर करणे हा उद्देश आहे.
यावेळी बोलताना हर्षवर्धन म्हणाले, संपृक्त स्निग्धांश हा सर्वात हानिकारक स्निग्धांश आहे. त्यांच्या वापराने आरोग्याला धोका आहे. त्याचा अन्नपुरवठ्यातून वापर करणे काढून टाकण्यासाठी भारत बांधील आहे. भारत सरकारने २०२२ पर्यंत संपृक्त स्निग्धांशाचा वापर थांबविण्यासाठी उद्दिष्ट ठेवले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने संपृक्त स्निग्धांशाचा वापर थांबविण्यासाठी २०२३ चे उद्दिष्ट दिले आहे.