नवी दिल्ली - अमेरिकेच्या १०० हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी भारताला भेट देणार आहेत. हे प्रतिनिधी अमेरिकेच्या वाणिज्य वार्षिक मोहिमेंतर्गत व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी भारतात येणार आहेत.
अमेरिकेच्या १०० हून अधिक कंपन्या व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी भारतात येणार - Wilbur Ross
अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने ११ व्या ट्रेड वाईंड्स बिझनेस फोरम आणि मिशनचे ६ मे ते १३ मे दरम्यान आयोजन केले आहे.
अमेरिकेच्या कंपन्यांचे प्रतिनिधी अहमदाबाद, चेन्नई, कोलकात्ता, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद शहरालाही भेट देणार आहेत. तसेच सत्ताधारी नेते व बाजारतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करणार आहेत. हे प्रतिनिधी आठ दिवसांच्या भारत भेटीवर असणार आहेत.
अमेरिकन कंपन्यांसाठी प्रत्येक स्त्रोत उपलब्ध करून देण्याचे अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे उद्दिष्ट आहे. या कंपन्यांच्या उत्पादने आणि सेवा जगभरात देण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे अमेरिकेच्या वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी सांगितले. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने ११ व्या ट्रेड वाईंड्स बिझनेस फोरम आणि मिशनचे ६ मे ते १३ मे दरम्यान आयोजन केले आहे. भारत-अमेरिकेमधील व्यापारात वृद्धी करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे अमेरिकेचे भारतामधील राजदूत केन्नेथ जस्टर यांनी म्हटले.