नवी दिल्ली - नुकतेच एसबीआयने आपल्या एटीएममधील व्यवहारांसाठी नवीन प्रणाली ( SBI ATMs transactions New System ) सुरू करण्याबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. यात त्यांनी आपण एटीएममधील व्यवहारांसाठी एक नवी प्रणाली आणत असल्याचे सांगितले आहे.
रोख काढण्याबाबत नवी प्रणाली -
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करणे हे नेहमीच एसबीआयचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी ओटीपी आधारित रोख काढण्याबाबत नवी प्रणाली ( OTP based cash withdrawal system ) आणत आहे.