नवी दिल्ली- तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण दिल्लीत कांद्यांचा भाव हा सफरचंदांहून अधिक झाला आहे. भाजीपाल्याचा घाऊक बाजारपेठेत कांदा हा ५० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर दुसरीकडे फळांच्या बाजारपेठेत सफरचंदांना प्रति किलो ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे.
किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रति किलो ६० ते ७० रुपये झाला आहे. आझादपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सूत्राच्या माहितीनुसार मोसमी सफरचंदाला प्रति किलो ३० ते ४० रुपये भाव मिळत आहेत. तर चांगल्या सफरचंदाचा भाव १०० रुपये प्रति किलो झाला आहे. शिमल्यावरून येणारे सफरचंद घाऊक बाजारात ३० ते ६० रुपये किलो दराने विकले जात असल्याचे आझादपूर फळे आणि भाजीपाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एम.आर.कृपलानींनी सांगितले. तर काश्मीरच्या सफरचंदांना घाऊक बाजारात प्रति किलो २० ते ५० रुपये दर मिळत आहे.
हेही वाचा-सरकार झुकले..! कांदा आयात करण्याच्या नव्या निविदेत पाकिस्तानला कोलदांडा